बालिकेला न्याय मिळवून दिल्याबद्दलपोलिसांचा सत्कार
- 151120746 - RAVINDRA BHAGWAN SHURUSHE
0
शासकीय पुनर्नियुक्ती माजी सैनिक संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने चिखली पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांचा सत्कार.
बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना यांच्यावतीने चिखली येथील नऊ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा चिखली पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही क्षणात गुन्हा दाखल करून अवघ्या काही तासातच आरोपींना गजाआड केले तर एवढ्यावरच न थांबता आरोपींना फाशीच्या शिक्षे पर्यन्त नेण्यासाठी वेळ काळ न पहाता कसून चौकशी करून सर्व कागदपत्रे व साक्षीदार ताबडतोब न्यायालयात सादर करून फाशीची शिक्षा सुनावण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे चिखली पोलीस स्टेशनची कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी बरकते साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, सुनिल पवार, शरद गिरी, नारायण तायडे, मुळे मॅडम यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व अशीच कार्य करण्याकरता त्यांना बळकटी मिळावी या हेतूने संघटनेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाकरिता संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक नायब तहसीलदार वीर साहेब, अध्यक्ष डी पी ठेंग,सचिव केशव सोनुने,कोषाध्यक्ष रमेश जोहरे, तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन केशव सोनुने तर आभार प्रदर्शन कऱ्हाळे यांनी केली.
प्रतिनिधी
रवींद्र सुरुशे ID 151120746