मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिग्दर्शक निशिकांत
- 151040748 - BHAGWATI DILIP SHUKLA
0
भगवती शुक्ला, राज्य ब्यूरो चीफ (महाराष्ट्र) :
चित्रपट माध्यमावर प्रेम करणारा उमदा आणि संवेदनशील अभिनेता, गुणी दिग्दर्शक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता, दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रपट सृष्टीसाठी आवश्यक अशी हरहुन्नरी कौशल्ये बाळगणाऱ्या निशिकांत कामत यांचा प्रवास अनेक होतकरूंसाठी प्रेरणादायी असा आहे. मराठी चित्रपटाद्वारे कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कामत यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले असे स्थान निर्माण केले. डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या कामत यांचे अवेळी जाणे चित्रपट सृष्टीसाठी नुकसानीचे आहे. चित्रपट माध्यमावर प्रेम करणारा उमदा, संवेदनशील अभिनेता, गुणी दिग्दर्शक आपण गमावला आहे. निशिकांत कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.