बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रूग्णालयातील परीस्थिती
- 151114996 - PRAMOD MISHRA
0
बुलढाणा सामान्य रुग्णालयात रूग्नांचे हाल
भयंकर परिस्थिती समोर
बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय कोविंड सेंटर येथील परिस्थिती अतिशय दयनीय आहे कुठल्याही प्रकारची स्वच्छता येथे नाही रुग्णांना येणारा डबा असतं निकृष्ट दर्जाचा आहे यामध्ये दोन पोळ्या भात आणि भाजी परंतु तो सुद्धा पुर्ण नाही दोन पोळ्या पेशंट जेवण सुद्धा होत नाही कुठल्याही प्रकारचा मेनू ठरलेला नाही रूग्णांची पुरेपूर काळजी इथे घेतल्या जात नाही वार्ड बॉय व्यवस्था येथे नाही एखाद्या रुग्णाला बाथरूमला जायचे असेल तर त्याला मदत करणारा सुद्धा कोणी नाही कित्येक रुग्ण बाथरूमला जाताना पडतात तरी त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार नाही सेवा बजावत असलेल्या स्टाफला प्रश्न केला तर त्यांचे उद्धटपणे उत्तर ऐकायला मिळतील तुम्हाला तुमच्या पेशंटची एवढी काळजी आहे तर आपण प्रायव्हेट हॉस्पिटल ला का येत नाही रुग्णांच्या नातेवाइकांचे व्यवस्थित बोलत सुद्धा नाही त्यांच्या प्रश्नांचे समाधान होत नाही अशी बुलढाणा कोविंड रुग्णालयाची कहाणी
रुग्णांना साधा सर्दी-पडसे जरी आले तरी प्रायव्हेट हॉस्पिटल ला डॉक्टर ट्रीटमेंट करायला नकार देतात ते सरळ कोळी सेंटर चा रस्ता दाखवतात अशा परिस्थितीत कोरोना नसणाऱ्या परंतु दुसरा आजार असणाऱ्या रुग्णांनी काय करायचे कोव्हिड सेंटरमध्ये दुसऱ्या आजाराचा उपचार सुद्धा होत नाही मग सामान्य रुग्णांनी काय करायचं यामध्ये विनाकारणच रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे प्रशासन काय करत आहे प्रशासनाला जाग कोणी आणायची का प्रत्येक वेळेस मीडियानेच दखल घ्यायची आणि नंतर प्रशासनाने अंमलबजावणी करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे याकडे प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देते हे पाहणे गरजेचे आहे
बुलढाणा से रविंद्र सुरुशे की एक रिपोर्ट